********** SCROLL DOWN FOR RECIPES IN MARATHI ************

Tuesday, February 5, 2013

Rainbow Cake (सप्तरंगी केक)

 
Ingredients:
 
1 Packet of White Sponge Mix
50 ml+25ml of water (As instructed on your Cake Mix Packet)
1 Egg
7 Edible Food Colors
Fresh / Double Cream

 
Procedure:
 
Pre-heat Oven at 200 Degree C.
In a mixing bowl empty cake mix and add egg .
Add 50 ml of water and beat with an electric beater for 2-3 minutes.
Now add remaining 25 ml of water and again beat for 2-3 minutes.
Divide batter into 7 different bowls.
Stir color into each bowl wih is own spoon.
Line baking tin wih parchment paper or wax paper.
Drop the colors one by one into middle of the tin. (Do not spread with spoon , drop one by one into the middle of each colored batter so that it spreads automatically)
Place cake in in pre-heated oven and bake for about 15-20 minutes or according to your packet instructions.
Bake until toothpick inserted comes our clean.
Cool it for 5 minutes and then transfer it cooling or wire rack to cool down completely.

 
Fill large pot or vessel with ice water.
Place other mixing bowl over it and pour chilled double or fresh cream in it.
Start whipping cream using elecric beater.
Add sugar as per taste and vanilla essence and start whipping again until soft peaks formed.
Do Not over whip cream , it turns to butter.
Remove a cup of whipped cream aside and mix any color of your choice.
Put whipped cream over cake and start spreading it evenly all over.
Spoon reserved whipped cream into pastry bag fitted with nozzle and pipe small circles from inside out .

 
Keep refrigerated for 1-2 hours.
Here how it looks after cutting it :)

 
Enjoy!!!! :))))
 
************************************************************************************
 
मराठी पाककृती:
 
साहित्यः

रेडीमेड स्पाँज केक मिक्स
५० मिली + २५ मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे)
१ अंडं
६-७ खाण्याचे रंग (मी लाल,शेंद्री,पिवळा,हिरवा,निळा,गुलाबी रंग वापरला आहे. लाल्+निळा+पिवळा रंग एकत्र करून ब्राऊन रंग तयार केला आहे)
फ्रेश क्रीम


पाकृ:
ओव्ह
न २०० डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हीट करा.
एका मिक्सींग बाऊल मध्ये केक मिक्स, अंडं व ५० मिली पाणी एकत्र करुन फेटून घेणे.
त्यात आता उरलेले २५ मिली पाणी घालून चांगले फेटणे.
फेटलेल्या मिश्रणाचे ७ भाग करावे व प्रत्येक भागात वेगवेगळा खाण्याचा रंग घालून मिक्स करावे.
(वेगळे बाऊल व चमचे वापरावे म्हणजे रंग एकमेकांमध्ये मिसळणार नाही)
केक टीनला बेकींग पेपर लावून घ्यावा किंवा बटर ने ग्रीज करून घ्यावे.
आता टीनच्या मध्यभागी लाल रंगाचे मिश्रण ओतावे, चमच्याने अजिबात पसरवायचे नाही.
लाल मिश्रणाच्या मधो-मध शेंद्री रंगाचे मिश्रण घालावे म्हणज लाल रंगाचे बॅटर आपोआप पसरेल.
शेंद्री रंगाच्या मिश्रणाच्या मधोमध गुलाबी रंगाचे मिश्रण घालावे.
असेच इतर रंगाचे मिश्रण मधोमध घालावे व केक टीन हलकेच आपटून घ्यावे म्हणजे हवेचे बुडबुडे निघून जातील.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक टीन ठेवून १५-२० मिनिटे बेक करणे.
विणायची सुई घालून पहावी, सुई स्वच्छ निघाली म्हणजे केक तयार झाला समजावे.
केकला कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवावे.


केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे.
एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.
गार झालेल्या केकचा बेकिंग पेपर काढून टाकावा व केकला सगळीकढून क्रीम लावून पसरावे.
मी थोडेसे फेटलेले क्रीम बाजूला काढून त्यात खायचा गुलाबी रंग घातला व पायपींग बॅगने केकवर सजावट केली.



सजावट केलेला केक थोड्या वेळ फ्रिजमध्ये ठेवा.
केक कापला की आतले सप्तरंग खुलून दिसतील :)



1 comment:

Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)

Happy Blogging Fellas !!!!

Contact Form

Name

Email *

Message *