Ingredients:
2 Cups Kabuli Chana washed and soaked overnight
(You can used boiled tin chana too)
2 Black cardamoms
3 Green Cardamoms
1 Inch Cinnamon stick
1 Bay leaf
2 Teabags
Salt
1 Big onion finely chopped
3 Tomatoes pureed
2 Tablespoons ginger-garlic paste
4 Slit Green Chillies
2 Teaspoons Cumin Powder
2 Teaspoons Coriander Powder
2-1/2 Teaspoons Red Chilli Powder
2 Teaspoons Chole Masala
1 Teaspoon Garam Masala
1 Teaspoon Aamchur powder
1 Teaspoon coarsely ground fennel seeds
Ginger julienns
Salt as per taste
Oil
Procedure:
In a pressure cooker, cook soaked kabuli chana alongwith salt, whole spices and tea bags tied in a muslin cloth.
Once cooked, strain the chana and keep stock aside alongwith whole spices
Discard teabags.
If you are using pre-bolied tin chana then you can boil water adding whole spices and tea bags tied in a muslin cloth.
when water is boiled add tin chana into it and let it sit for 1 hour.
Strain chana and reserve stock alongwith whole spices
Discard teabags.
In a large pan heat oil and add the chopped onions.
Fry till golden brown.
Add 2 slit green chilies, tomato puree and ginger-garlic paste.
Saute until raw smell goes off.
Add the cooked chole and all the spice powders, stir and saute for a minute.
Now add the stock to the chole and simmer till the curry thickens a bit.
When the gravy thickens, add salt and check the
seasonings and add more if required.
In a small skillet, heat oil and make a tempering of 2 green chilles and ginger juliennes and pour over ready chole gravy.
Garnish with chopped coriander.
Serve hot with Roti, Naan, Kulcha or Parathas.
*********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
२ वाट्या काबुली चणे धुवून, रात्रभर भिजत घालणे
(तुम्ही टीनमधले चणेही वापरू शकता)
२ मसाला वेलदोडे
३ हिरवी वेलची
१ इंच दालचिनी
१ तमालपत्र
२ टीबॅग्ज
मीठ
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
३ टोमॅटोंची प्युरी
२ टेस्पून्स आले - लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
२ टीस्पून जीरेपूड
२ टीस्पून धणेपूड
२-१/२ टीस्पून लाल तिखट
२ टीस्पून छोले मसाला
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून भरडसर वाटलेली बडीशेप
आल्याचे पातळ उभे काप
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
प्रेशर कुकरमध्ये काबुली चणे, मीठ, खडे मसाले + टी बॅग्ज एका कापडी पोटलीत बांधून शिजवून घ्यावे.
चणे शिजल्यावर स्टॉक गाळून, खड्या मसाल्यांसोबत चणे काढून ठेवावे.
टीबॅग्ज फेकून द्याव्यात.
स्टॉक बाजूला ठेवावा.
जर तुम्ही प्री-बॉईल्ड टीनमधले चणे वापरत असाल तर, एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे.
त्यात टी बॅग्ज व खडे मसाल्यांची पोटली घालून उकळी काढावी.
त्यात उकडलेले चणे तासभर भिजवत ठेवावे.
स्टॉक गाळून, खड्या मसाल्यांसोबत चणे काढून ठेवावे.
टीबॅग्ज फेकून द्याव्यात.
एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगावर परतावा.
त्यात आता २ मिरच्या, आले - लसूण पेस्ट व टोमॅटॉ प्युरी घालून परतणे.
त्यात शिजवलेले छोले, सर्व मसाले घालून चांगले मिक्स करणे.
त्यात स्टॉक घालून, सिमवर ग्रेव्ही दाट होईपर्यंत शिजवणे.
जेव्हा ग्रेव्ही दाटसर होऊ लागेल तेव्हा त्यात मीठ घालावे व चव घेऊन पहावे, लागल्यास अजून घालावे.
तेलाच्या बुट्टीमध्ये तेल गरम करून त्यात मिरच्या व उभे चिरलेले आल्याची फोडणी करावी व तयार छोल्यांवर ओतावी.
वरून कोथिंबीर पेरावी.
गरमा-गरम अमृतसरी छोले रोटी, नान, कुलचे किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करावे.


No comments:
Post a Comment
Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)
Happy Blogging Fellas !!!!