Ingredients:
1-1/2 Cups All Purpose Flour (Maida)
1/2 Cup Warm water
1 Tablespoons Sugar
1 -1/4 Teaspoon Active dry yeast
1/2 Teaspoon Salt
1 Tablespoon Garlic Butter / Plain Butter
1 Teaspoon White sesame seeds
1/2 Teaspoon Nigella Seeds (Kalaunji)
Vegetables & Herbs of your choice
I used colourful Bell peppers, Coriander leaves with stalks, Cherry Tomatoes, Carrots, Onions and Rosemary.
Procedure:
In a bowl, combine warm water, sugar and sprinkle yeast.
Mix well and cover and keep aside for 10 minutes.
Seive flour and keep aside.
When the yeast mixture becomes frothy, add salt and flour little at a time.
Keep mixing gently, start kneading till you get non-sticky, smooth dough.
Keep in a greased bowl and cover with tea towel and rest in warm place for 1 hour.
I used my instant pot to speed up the process.
After one hour, dough is doubled in size.
Punch down the air and knead gently for 1 minutes.
Try to shape it like a leaf using rolling pin or any other shape you desire.
Place this on a lined baking tray and rest for 1 hour.
Pre- heat Oven at 180 Degree C.
Put on your creativity hat. and top up your dough with herbs & veggies.
You can decorate with any available veggies you have to hand.
Scatter sesame and Nigella seeds over the dough.
Place in an oven and bake at 180 Degree C for 25 - 30 minutes.
Once done, remove from the oven and gently place on a cooling rack.
Brush some butter over it. I like to used Garlic butter, it enhances the flavour of the bread.
Cool completely and then cut it into squares and serve with any flavoured bread dipping oil.
you can also pair it up with any soup.
*********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
दीड वाट्या मैदा
१/२ वाटी कोमट पाणी
१ टेबलस्पून साखर
१-१/४ टीस्पून अॅक्टिव्ह ड्राईड यीस्ट
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून गार्लिक बटर / साधं बटर
१ टीस्पून पांढरे तीळ
१/२ टीस्पून कलौंजी
भाज्या व हर्ब्स आवडीप्रमाणे
मी येथे रंगीत शिमला मिरच्या, कोथिंबीर देठासकट, चेरी टोमॅटोज,गाजर, कांदे व रोझमेरी असे वापरले आहे.
पाकृ:
एका बाऊलमध्ये, कोमट पाणी, साखर एकत्र करावे.
त्यावर यीस्ट भुरभूरून मिक्स करावे.
झाकून १० मिनिटे बाजूला ठेवावे.
मैद्याला चाळून घ्यावे.
१० मिनिटानंतर जेव्हा यीस्टचे मिश्रण फेसाळ झाले असेल तेव्हा त्यात मीठ व थोडा थोडा करून मैदा घालून मिक्स करावे.
मिक्स करून, चांगले मऊसूत होईपर्यंत मळून घ्यावे म्हणजे हाताला अजिबात चिकट लागणार नाही.
ग्रीझ केलेल्या बाऊलमध्ये मळलेले पीठ ठेवून, झाकून उबदार जागी एक तासभर ठेवावे.
मी येथे माझा इंस्टंट पॉटचा वापर केला आहे पीठ फुलून येण्यासाठी.
एका तासाने पीठ फुलून दुप्पट झालेले असेल.
हलका बुक्का मारून त्यातील हवा काढून टाकावी व १ मिनिट चांगले मळून घ्यावे.
लाटण्याच्या आधाराने लाटून पानाचा आकार द्यावा किंवा तुम्हाला हवे तो आकार द्या.
बेकिंग पेपर लावलेल्या ट्रेवर अलगद उचलून ठेवा आणि एक तास पुन्हा उबदार जागी ठेवा.
अव्हन १८० डीग्री सें वर प्री-हीट करायला ठेवा.
पिठावर तुम्हाला हवे तसे तुम्ही भाज्या व हर्ब्ज लावून सजवावे.
इथे तुमच्या कल्पकतेला वाव आहे.
त्यावर तीळ व कलौंजी भुरभूरावी.
बेकिंग ट्रे अव्हनमध्ये ठेवून १८० डीग्री सेंवर २५-३० मिनिटे बेक करावे.
ब्रेड बेक झाल्यावर, बाहेर काढून कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी ठेवावे.
त्यावर गार्लिक बटर / साधे बटर ब्रश करावे व संपूर्णपणे थंडं होऊ द्यावे.
गार झाल्यावर चौकोनी तुकडे कापून कुठल्याही फ्लेव्हर्ड ब्रेड डीपिंग ऑईलसोबत सर्व्ह करावे.
तुम्ही सूपसोबतही सर्व्ह करू शकता.





No comments:
Post a Comment
Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)
Happy Blogging Fellas !!!!